उत्तर प्रदेशमध्ये 'बाजीराव मस्तानी'ला मानाचं पान

बाजीराव मस्तानीला उत्तर प्रदेशमध्ये मानाचं पान मिळालंय.

Updated: Jan 22, 2016, 10:49 PM IST
उत्तर प्रदेशमध्ये 'बाजीराव मस्तानी'ला मानाचं पान

लखनऊ: बाजीराव मस्तानीला उत्तर प्रदेशमध्ये मानाचं पान मिळालंय. बाजीराव मस्तानी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या कुटुंबासोबत बाजीराव मस्तानी बघितला, आणि चित्रपट आवडल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. 

संजय लीला भन्सालींच्या बाजीराव मस्तानीनं याआधीच अनेक विक्रम मोडलेत. आत्तापर्यंत बाजीराव मस्तानी चित्रपटानं 184.16 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. तर त्याच दिवशी रिलीज झालेला शाहरुख खान आणि काजोलचा दिलवाले मात्र बाजीराव मस्तानीच्या मागे पडला आहे.