नाशिक : अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर नाशिकमध्ये हल्ला झालाय. आपल्या आगामी 'बाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता तिथे गेली होती. दरम्यान, तिला काही लागलं नसल्याचं अमृतानं झी मीडिया प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलंय.
नाशिकमधील एका कॉलेजमध्ये तिचा आगामी चित्रपट "बाजी‘च्या प्रमोशनसाठी आली होती. तिच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदेही होता. मात्र तिथं जमा असलेल्या काही टवाळखोरांनी दगड फेकला. तो अमृताच्या कानाजवळून गेला.
"आम्ही नाशिकमधील एका कॉलेजमध्ये सिनेमाचं प्रमोशन करत होतो. त्यावेळी जमावातून आलेला दगड मला लागला. मात्र मला फार मोठी दुखापत झाली नाही. पण हा हल्ला कोणी जाणीवपूर्वक केला असेल, असं मला वाटत नाही. उत्साहाच्या भरात लोकांनी हे कृत्य केलं असावं, असा अंदाज अमृतानं व्यक्त केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.