कॅलिफोर्निया : अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अँकॅडमी एवार्ड्स अर्थात ऑस्कर 2015मध्ये बर्डमॅनने चार कॅटॅगरीजमध्ये बाजी मारत बेस्ट फिल्मचा किताब मिळवलाय. बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले आणि बेस्ट सिनेमॅटोग्रॅफीसाठी बर्डमॅनने बाजी मारली. तर बेस्ट एक्टर म्हणून द थियरी ऑफ एव्हरीथिंगसाठी एडी रेडमेन, बेस्ट एक्ट्रेस म्हणून ज्युलियान मूर 'स्टिल अँलिस'मधील भूमिकेसाठी ऑस्कर विनर ठरली.
जे. के. सिमन्स यांना व्हिप्लॅश सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर पॅट्रिसिया आर्केटला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय..... सर्वोत्कृष्ठ रंगभूषा पुरस्कार फ्रँन्सीस हॅनन आणि मार्क कुलीयर यांना मिळाला. मिलिना कॅनोनिरीला सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी पुरस्कार मिळाला. बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगरीसाठी इडाने बेस्ट फिल्मची मोहोर उमटवली. भारतासाठी मात्र यंदा निराशाचं पदरी पडलेली आहे. अंतिम नामांकन यादीत एकाही भारतीय सिनेमाला स्थान मिळालेलं नाही.
ऑस्कर 2015 च्या शानदार सोहळ्यात कोण ठरले मुख्य आकर्षण त्यावर एक नजर टाकूयात.........
1) सर्वोत्कृष्ट फिल्म- बर्डमॅन- एकूण 4 कॅटॅगिरीजमध्ये बाजी
2) सर्वोत्कृष्ट अभिनेता- एडी रेडमन- फिल्म- द थिअरी ऑफ एव्हरीथिंग
3) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ज्युलिआन मूर- फिल्म- स्टिल एलिस
4) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- जे.के. सिमन्स- फिल्म- व्हिप्लॅश
5) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पॅट्रिशिया आर्केट-
6) सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म- इडा
7) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- एलेजान्ड्रो- फिल्म- बर्डमॅन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.