सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'ने केले पाच बॉक्स ऑफीस रेकॉर्ड

सलमान खान आणि सूरज बडजात्या यांची जादू पुन्हा एकदा चालली आहे. बॉक्स ऑफीसवर त्याने एक नाही दोन नाही पाच रेकॉर्ड केले आहे. 

Updated: Nov 20, 2015, 06:36 PM IST
 सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'ने केले पाच बॉक्स ऑफीस रेकॉर्ड  title=

 मुंबई : सलमान खान आणि सूरज बडजात्या यांची जादू पुन्हा एकदा चालली आहे. बॉक्स ऑफीसवर त्याने एक नाही दोन नाही पाच रेकॉर्ड केले आहे. 
 
 आतापर्यंत आठ दिवसांत या चित्रपटाने १६० कोटी रूपये कमविले आहे. या चित्रपटाने पाच बॉक्स ऑफिस रेकॉर्ड केले आहेत. 
 
१)  २०१५मध्ये ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई 
या चित्रपटाने २०१५ मध्ये पहिल्याच दिवशी ३९.५० कोटी रूपयांची कमाई केल्याचा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी सलमानच्या नावावरच २०१५मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बजरंगी भाईजानचा रेकॉ़र्ड होता. बजरंगीने यापूर्वी २६ कोटी रूपयांची कमाई केली होती. त्यानंतर प्रेम रतन धन पायोने सर्वाधिक कमाई केली आहे. 

२) पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट 

गेल्या वर्षी शाहरूख खान याच्या हॅपी न्यू इअरनं पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केल्याचा रेकॉर्ड केला होता. या चित्रपटाने ३६ कोटी रूपये पहिल्या दिवशी कमाई केली होती. पण त्याचा रेकॉ़र्ड सलमानने तोडला आहे. सलमानच्या प्रेम रतन धन पायोने ३९ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱा पहिला चित्रपट ठरला आहे. 

३) सोनमसाठी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 
हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सोनमने भाकित व्यक्त केले होते की प्रेम रतन धन पायो पहिल्या दिवशी सर्व रेकॉर्ड तोडणार आहे. त्यानुसार या चित्रपटाने कामगिरी केली आहे. हा चित्रपट सलमानचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला तसा तो सोनमसाठीही सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट ठरला आहे. 

४) सूरज बडजात्याचा पहिला १०० कोटींचा चित्रपट 

बडजात्या हे आपल्या कौटुंबिक चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या प्रेक्षकांशी नाळ जोडून घेण्यात त्यांना नेहमी यश मिळते. प्रेम रतन धन पायो हा आउट डेटेड होण्याची भीती होती पण सूरज बडजात्या यांची जादू पुन्हा चालली आणि सूरज बडजात्या यांनी पहिल्यांदा १०० कोटींची रेषा ओलांडली आहे. 

५) २०० कोटींकडे वाटचाल 
आतापर्यंत या चित्रपटाने १६० कोटी रूपये कमाविले आहे, पण आगामी काळात हा चित्रपट केवळ २०० कोटींच्या आसपास जाण्याची शक्यत आहे. या चित्रपटाने घेतलेली आघाडी आपण पाहिली पण याची वाईट माऊथ पब्लिसिटी याला दणका देण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.