व्हेनेझुएला: पैशासाठी लोकं काय-काय करत नाहीत. चोरी, दरोडा सोबतच तस्करीही करतात. कुणी सोन्याचं बिस्कीट तोंडात तर कुणी अंडकविअरमध्ये लपवून परदेशात नेतात. आता तर आणखी धक्कादायक घटना घडलीय. व्हेनेझुएलाच्या एका महिलेनं आपल्या स्तनामध्ये 1.7 किलो कोकेन लपवून नेत होती. कोकेन लपविण्यासाठी महिलेनं ब्रेस्ट इंप्लांट करवलं होतं.
ही घटना स्पेनची आहे. जिथं पोलिसांनी स्पेनच्या माद्रिद एअरपोर्टवरून एका महिलेला अटक केलीय. पोलिसांच्या ताव्यात आलेली व्हेनेझुएलाची राहणारी 43 वर्षीय महिलेनं बोगोटा, कोलंबियाहून माद्रिदसाठी निघाली होती. मात्र माद्रिद एअरपोर्टवर उतरल्यानंतर महिलेवर एअरपोर्टवर असलेल्या अधिकाऱ्यांची नजर गेली. त्यांना तिच्यात काही गडबड वाटली. मग तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली, पण काही नाही मिळालं.
यानंतर पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली. तेव्हा तिनं सगळं खरं खरं सांगितलं. एअरपोर्टच्या महिला अधिकाऱ्यांनी मग त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तिथं डॉक्टरांनी नकली स्तन काढून 1.7 किलो कोकेन हस्तगत केलं. पकडलं गेलेल्या कोकेनची किंमत 71,000 डॉलर आहे.
महिलेनं कोकेनच्या तस्करीसाठी आपल्या स्तनामध्ये ते भरून ब्रेस्ट इंप्लांट करवले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.