मुंबई : सध्या यूएईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्तीवर निर्बंध आणायची तयारी केलीय... ही माहिती यूएई सरकारनं भारत सरकारला दिलीय.
यूएईमध्ये दाऊद इब्राहिमची जवळपास ५,००० करोड रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं सांगण्यात येतंय. दाऊदनं आपल्या संपत्तीचा मोठा भाग त्याची मोठी मुलगी माहरुख आणि जावई जुनैद यांच्या नावावर केल्याचंही चौकशीतून पुढे येतंय.
अधिक वाचा - जावेद मियाँदादचा भारतदौरा रद्द
उल्लेखनीय म्हणजे, माहरुख हिचा विवाह पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियाँदाद याचा मोठा मुलगा जुनैद मियाँदाद याच्यासोबत झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, अल नूर डायमंडस्, ओएसिसि पॉवर एलसीसी नावाच्या फर्म दाऊदच्याच आहेत. याशिवाय डॉल्फीन कन्स्ट्रक्शन, ईस्ट-वेस्ट एअरलाईन्स, किंग व्हिडिओ, मोइन गारमेन्टस नावाच्या कंपन्याच्या दाऊदच्याच आहेत. यापैंकी बऱ्याचशा कंपन्या दाऊदनं आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या नावावर केल्याचं सांगण्यात येतंय.
दाऊदचा बिझनेस त्याच्या कुटुंबियांच्या नावे असला तरी त्याची सगळी कमान मात्र डी कंपनीवर आहे. डी कंपनीचे मेम्बर हा सगळा कारभार पाहतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.