भूकंपानंतर नेपाळमध्ये सरोगेट मातांची दु:खद कहानी

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात सरोगेट भारतीय महिलांची दु:खद कहानी समोर आली आहे. सरोगसीचा पर्याय स्विकारणारी इस्त्रायली समलैंगिक जोडपी विशेष विमानाने १५ नवजात बालकांना घेऊन मायदेशी गेले. 

PTI | Updated: May 2, 2015, 03:02 PM IST
भूकंपानंतर नेपाळमध्ये सरोगेट मातांची दु:खद कहानी  title=

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात सरोगेट भारतीय महिलांची दु:खद कहानी समोर आली आहे. सरोगसीचा पर्याय स्विकारणारी इस्त्रायली समलैंगिक जोडपी विशेष विमानाने १५ नवजात बालकांना घेऊन मायदेशी गेले. 

मात्र, त्यांच्या सरोगेट आईंना नेपाळच्या विदारक स्थितीत एकटं सोडण्यात आलं आहे. या सर्व महिला तीन ते चार आठवड्यांपूर्वीच आई झाल्या आहेत. यात एक महिला अशीही आहे जी ९ महिन्यांची गर्भवती आहे. कोणत्याही क्षणी नवजात बालकाला जन्म देऊ शकते. 

दरम्यान, मात्र हे सर्व खासगी प्रकरण असल्याचं सांगत भारतीय परराष्ट्र मंत्रालय हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.