काठमांडू : नेपाळमध्ये दो वर्षाचा मुलगा सध्या खूपच चर्चेत आला आहे. त्याच्या पाठीवर असलेल्या तिसऱ्या हातामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गौरव नावाच्या या मुलाला झोपतांना त्रास होतो आहे. पाठीवरचा हा हात सर्जरीने काढता येणार आहे पण यादरम्यान त्याला पॅरेलिसीस होऊ शकतो.
लोकं म्हणतायंत देवाचं रुप
जन्मापासूनच गौरवच्या पाठीवर हा हात आहे. पाठीवर झोपतांना आणि कपड घालतांना त्याला त्याचा त्रास होतो. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सुरुवातीलाच त्याला योग्य उपचार नाही मिळाले. तर काही लोकांकडून तो देवाचं रुप असल्याने त्याच्या पाठीवर हात असल्याचं म्हटलं जात आहे आणि शस्त्रक्रिया न करण्याचे सल्ले देण्यात आले आहे. डॉक्टर्सचं म्हणणं आहे की, पाठीवरील हा हात न काढल्यास मनक्याचा त्रास होऊ शकतो. शस्त्रक्रिया करु की नये याबाबत त्यांचं कुटुंबिय अजून संभ्रमात आहे. पण सध्या नेपाळमध्ये गौरवच्या चर्चा आहेत.
स्पाईना बिफिडा कंडीशन
स्पाइना बिफिडा कंडीशन ही १५०० पैकी एका मुलामध्ये पाहायला मिळते. पण यामध्ये वेगळा हात किंवा पाय असणे ही स्थिती वेगळीच आहे. गर्भावस्थेच्या प्रक्रियेत काही अडचणी आल्याने ही स्थिती तयार होते.