नवी दिल्ली : सोमवारचा ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात आजही संभ्रमाचं वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं जपान, आणि चीनचे आज सकाळी पुन्हा आपटले. पण, काही वेळातच पुन्हा एकदा सावरू लागले आहेत.
सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेतला डाऊ जोन्स निर्देशांक तब्बल साडे पाच टक्के कोसळला. दिवसाच्या अवघ्या चार मिनिटात १००० अंकांनी कोसळणारा अमेरिकन बाजार दिवस अखेर काहीसा सावरला. पण, चीनच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीचे साऱ्या जगावर होणाऱे गंभीर परिणाम अमेरिकन बाजारातल्या पडझडीनं पुन्हा एकदा अधोरेखित झालेत.
काल अमेरिकन बाजारातल्या विक्रीच्या सुनामीनंतर आज सकाळी जपान आणि चीनच्या बाजारातही आज सकाळपासून पुन्हा एकदा घसरण झालीय.चीनमधल्या शांघायचा बाजार सकआळी उघडल्यावर साडे सहा टक्के घसरला. पण काही वेळातच सुधारलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.