फैसलाबाद : उधमपूर हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद संबंधी आतापर्यंत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे राहणाऱ्या दहशतवाद्याच्या वडिलांनी स्वीकार केले आहे की नावेद त्यांचा मुलगा आहे.
गुरूवारी संध्याकाळी पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषद घेऊन दहशतवादी नावेद पाकिस्तानी नसल्याचे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार दहशतवाद्यांच्या वडिलांनी स्वतः हे मान्य केले की नावेद माझा मुलगा आहे. त्यामुळे नावेद पाकिस्तानी आहे का हा संशय पूर्णपणे नाहीसा झाला आहे.
नावेदच्या वडिलांनी सांगितले की, मी त्याचा दुर्दैवी बाप आहे. आता लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी लष्कर या दोघांकडून माझ्या जीवाला धोका आहे. यानंतरच त्याने फोन बंद केला. पण नावेदच्या वडिलांनी पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.