www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेतील महात्मा म्हणून समजले जाणारे नेल्सन मंडेला यांच्यावर १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंत्यसंस्काराची तयारी ही शनिवारीच सुरु करण्यात आली आहे. तसंच त्यांची शोकसभा १० दिवस चालणार आहे. या शोकसभेत जगभरातून असंख्य लोक आणि नेते मंडळी येण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्ग या ९५,००० सीटची क्षमता असलेल्या स्टेडियमवर मंगळवारी मंडेला यांची शोकसभा होणार आहे. या शोकसभेत मोठ्या प्रमाणावर जनता एकत्रित येण्याची शक्यता आहे.
प्रदीर्घ आजारपणामुळं काल ९५वर्षाच्या वयात मंडेला यांची प्राणजोत मावळली. मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत शोकसभा ठेवण्यात आली आहे. ही शोकसभा उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. मंडेला यांचं पार्थिव हे अंत्यसंस्काराच्या आधी प्रीटोरियाच्या यूनियन बिल्डिंगमध्ये तीन दिवस ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अत्यसंस्कार हे त्यांच्या जन्मभूमी कुनू इथं करण्यात येईल. या तीन दिवसांत त्यांची अंतयात्रा प्रीटोरियाच्या रस्त्यावरुन अंत्यसंस्कार स्थळापर्यंत येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत रविवारी ८ डिसेंबर हा प्रार्थना दिवस म्हणून घोषित करण्यात आलाय. ११ ते १३ डिसेंबर या दिवशी दक्षिण अफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती मंडेला यांच्या आठवणीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगभरातील लोक हे मोठ्या संख्येनं मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी तीन राष्ट्राध्यक्षही मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.