नवी दिल्ली : आधुनिक सिंगापूरचे शिल्पकार आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना आदरांजली म्हणून रविवारी भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे.
ली यांचं सोमवारी दीर्घ आजारानं सिंगापूरला निधन झालं होतं. आशिया खंडातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना झालेल्या या नेत्याच्या स्मृतीला वंदन म्हणून एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरला रवाना झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.