गर्भश्रीमंत राजा `कॉमन मॅन`च्या पाण्याचेही प्रश्न सोडवतो

दुबईचे राजे शेख मोहंमद बिन राशीद अल मकतूम हे २७ हजार कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र सत्ता आणि पैशांच्या या चकचकाटात ते आजही साधी राहणी पसंत करतात. ते त्यांच्या देशाचे २००६ पासून पंतप्रधान आहेत.

Updated: Jan 16, 2014, 01:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दुबई
दुबईचे राजे शेख मोहंमद बिन राशीद अल मकतूम हे २७ हजार कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र सत्ता आणि पैशांच्या या चकचकाटात ते आजही साधी राहणी पसंत करतात. ते त्यांच्या देशाचे २००६ पासून पंतप्रधान आहेत.
देशातील कोणताही कॉमन मॅन त्यांना कोणत्याही समस्येवर त्यांना थेट फोन करू शकतो.
दुबईत पाण्याची समस्या सर्वात महत्वाची मानली जाते. आपल हा नंबर त्यांनी आपल्या सरकारी प्रसिद्धी माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. शेख साहेबांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा दूबईत वीज नव्हती, पाणी नव्हतं, वीज नसल्याने कंदीलचा वापर होत असे.
मात्र आज दुबई बदललंय, आज देशातील कोणताही कॉमन मॅन त्यांच्याकडे पाण्या सारखी समस्या घेऊनही पोहोचू शकतो. त्यांच्या महालात आजही महिन्यातून एकदा नव्हे, तर दररोज जनता दरबार भरतो, दरबारात ते लोकांच्या समस्या आधी ऐकून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.
शेख साहेब २७ हजार कोटी रूपयांचे मालक आहेत. मात्र स्मार्टफोनच्या जमान्यात आजही ते साधाच फोन वापरतात.
हा फोन ते १० वर्षापासून वापरतायत, त्यांच्याकडे दोन फोन आहेत, एक खासगी आणि एक कॉमन मॅनसाठी, शेख आपली गाडी सहसा स्वत:च चालवतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.