चर्चमधील २ टक्के पाद्री लैंगिक शोषण करतात - पोप

कॅथलिक चर्चमधील सुमारे २ टक्के पाद्री लैंगिक शोषण करत असतील, असं धक्कादायक विधान ख्रिश्चन धर्मीयांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केलंय. पाद्रींना विवाह करण्याची परवानगी देणं हाच यावर उत्तम पर्याय असल्याची सूचनाही फ्रान्सिस यांनी केली आहे. 

AFP | Updated: Jul 14, 2014, 01:54 PM IST
चर्चमधील २ टक्के पाद्री लैंगिक शोषण करतात - पोप title=

व्हॅटिकन सिटी: कॅथलिक चर्चमधील सुमारे २ टक्के पाद्री लैंगिक शोषण करत असतील, असं धक्कादायक विधान ख्रिश्चन धर्मीयांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केलंय. पाद्रींना विवाह करण्याची परवानगी देणं हाच यावर उत्तम पर्याय असल्याची सूचनाही फ्रान्सिस यांनी केली आहे. 

इटलीतील एका वृत्तपत्राला फ्रान्सिस यांनी मुलाखात दिली असून यात त्यांनी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची तुलना थेट कुष्ठरोगाशीच केली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण कदापी सहन केलं जाणार नाही, असा इशाराही फ्रान्सिस यांनी दिला आहे. 

जगभरातील ४ लाख १४ हजार पाद्रींपैकी सुमारे ८ हजार पाद्रींवर लैंगिक शोषणाचे आरोप असतील अशी माहिती सल्लागारांकडून मिळाली आहे, असा गौप्यस्फोट फ्रान्सिस यांनी केला आहे. या दोन टक्क्यांमध्ये पाद्री, बिशप आणि कार्डिनल या सर्वांचा समावेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. फ्रान्सिस यांच्या विधानानं जगभरात खळबळ माजली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.