पोपटाने केली नवऱ्याची पोलखोल

कुवैतमधील एका व्यक्तीला आपल्या घरी पोपट पाळणे चांगलेच महागात पडलेय. पोपट हुशार असतात मात्र तितकेच बोलबच्चनही. मात्र त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा माणसांना त्रासदायक ठरते. असेच काहीसे कुवैतमधील एका व्यक्तीसोबत झालेय. 

Updated: Oct 27, 2016, 10:07 AM IST
पोपटाने केली नवऱ्याची पोलखोल title=

कुवैत : कुवैतमधील एका व्यक्तीला आपल्या घरी पोपट पाळणे चांगलेच महागात पडलेय. पोपट हुशार असतात मात्र तितकेच बोलबच्चनही. मात्र त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा माणसांना त्रासदायक ठरते. असेच काहीसे कुवैतमधील एका व्यक्तीसोबत झालेय. 

अरब टाईम्सच्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे त्याच्याच घरातील मोलकरणीसोबत अफेयर होते. पती आणि मोलकरीण यांच्यातील रोमँटिक गप्पा अनेकदा त्या पोपटासमोर व्हायच्या. मात्र एक दिवस त्या पोपटाने पत्नीच्या समोर पती आणि मोलकरीण यांच्यात जे बोलणे झाले ते ऐकवले.

पोपटाचे ते बोलणे ऐकून पत्नीच्या रागाचा पारा चढला. तिने तडक पोलीस स्थानक गाठले आणि पतीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. पत्नीचा आपल्या पतीवर याआधीही संशय होता. पोपटाच्या बोलण्यानंतर हा संशय खरे असल्याचे समोर आले. 

दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोर्टात केवळ पोपटाच्या बोलण्यावरुन पती दोषी असल्याचे सिद्ध करता येत नाही. पोपटाने ऐकवलेले संभाषण टिव्हीवरील कार्यक्रम अथवा व्हिडीओतीलही असू शकते.