पॅरिस : फ्रान्समधील पॅरिस येथे मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आलाय. अतिरेक्यांनी ७ ठिकाणी हे हल्ले केलेत. यात १५८ हून अधिक लोक ठार झालेत. तर १०० लोकांना अतिरेक्यांनी ओलीस धरले आहे. फूटबॉल स्टेडिअमजवळ हा हल्ला करण्यात आला. यावेळी जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात फूटबॉलचा सामना सुरु होता. तर आज जी-२०ची परिषद होणार होती.
पॅरिस शहरात अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय. फूटबॉल स्टेडियमजवळ मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. यात १४० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. रेल्वे, हवाई सेवा बंद करण्यात आली आहे. फ्रान्सच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रपतींनी आपला जी-२० दौरा रद्द केला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर पॅरिस शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्याचा निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. याबाबत त्यांनी ट्विट केलेय. आम्ही फ्रान्सबरोबर आहोत, असे मोदी यांनी म्हटलेय.
News from Paris is anguishing & dreadful. Prayers with families of the deceased. We are united with people of France in this tragic hour.
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2015
Crazy! Stade de France right now. #ParisAttacks pic.twitter.com/Pz4OhkOTqm
— Julian Röpcke (@JulianRoepcke) November 13, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.