शिक्षकांना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण

पेशावरमधील मिलिट्री स्कूलवर गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता वायव्य पाकिस्तानमधील शिक्षकांना बंदूक बाळगण्याचे आणि चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Updated: Jan 28, 2015, 02:01 PM IST
शिक्षकांना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण

पेशावर : पेशावरमधील मिलिट्री स्कूलवर गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता वायव्य पाकिस्तानमधील शिक्षकांना बंदूक बाळगण्याचे आणि चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वायव्य पाकिस्तानमध्ये येत असलेल्या पेशावरमधील शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. हल्ल्यात १५० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये १३२ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

या हल्ल्यानंतर वायव्य पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच शाळांनाही सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

खैबर पख्तुनख्वाँ प्रांताचे शिक्षणमंत्री अतीफ खान यांनी सांगितले, की प्रांतातील प्रत्येक शाळेत शस्त्रास्त्रे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिक्षकांनाही बंदूका चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रांतात सुमारे 35 हजार शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत.

या सर्वांना सुरक्षा पुरविणे अशक्य आहे. त्यामुळे बंदुका ठेवण्याच्या परवानगी देण्यात आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.