www.24taas.com, वॉशिंग्टन
चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारा मानव नील आर्मस्ट्राँग यांचा दफनविधी १३ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. हा दफनविधी समुद्रकिनाऱ्यावर करण्यात येणार असल्याची माहिती आर्मस्ट्राँग परिवाराचे प्रवक्ते रिक मिलर यांनी दिलीय.
२५ ऑगस्ट रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं होतं. ह्रदयप्रकियेतील बिघाडामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा दफनविधी मात्र अजून झाला नाही. नील आर्मस्ट्राँग यांचं पार्थिव १३ सप्टेंबर रोजी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा दफनविधी पार पडेल. मात्र दफनविधीची वेळ किंवा ठिकाण यांबाबत अजून कोणताही तपशील उपलब्ध करण्यात आलेला नाही. वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रलमध्ये होणार्याक अंत्यविधीसाठी नासाचे प्रमुख चार्ल्स बोल्डन, माजी व आजी अंतराळवीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नील आर्मस्ट्राँग यांनी २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिलं मानवी पाऊल ठेऊन एक इतिहास कायम केला होता. बझ ऍल्ड्रिन आणि आर्मस्ट्राँग हे चंद्रावर तेव्हा अडीच तास चंद्रावर चालले होते. त्यावेळी त्यांनी नमुने गोळा करणे, छोटे छोटे प्रयोग करणे, तसेच छायाचित्रे घेणे यांसाठी त्या अडीच तासांचा उपयोग केला. माइकेल कॉलिन्स तेव्हा अवकाश यानाच्या कक्षात थांबून ते नियंत्रित करीत होता.