71 चा वर आणि 114 ची वधू, प्रेमाची अनोखी कहाणी

चीनमध्ये सध्या एका लग्नाची फार मोठी चर्चा रंगली आहे. या लग्नाची विशेषता ही आहे की, वधू आणि वर हे दोघेही वयोवृद्ध आहेत. वधू ही वरापेक्षा 43 वर्षांनी मोठी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच वेगळी आहे. एका दवाखान्यात दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

Updated: Oct 13, 2016, 07:25 PM IST
71 चा वर आणि 114 ची वधू, प्रेमाची अनोखी कहाणी title=

हाँगकाँग : चीनमध्ये सध्या एका लग्नाची फार मोठी चर्चा रंगली आहे. या लग्नाची विशेषता ही आहे की, वधू आणि वर हे दोघेही वयोवृद्ध आहेत. वधू ही वरापेक्षा 43 वर्षांनी मोठी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच वेगळी आहे. एका दवाखान्यात दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

कसं झालं प्रेम

चीनमधील झिनजियांग प्रांतातील काशगर शहरातील हे लग्न सध्या चर्चेत आहे. वर हा 71 वर्षाचा आहे तर वधू ही 114 वर्षाची आहे. वर झेंग म्हणतात की हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. एका वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा त्यांची प्रेमिका झेंग शुईंगला पाहिलं तेव्हा त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली.

पण झेंग यांना त्यांची प्रेमिका झेंग शुईंगला लग्नासाठी तयार करण्यासाठी त्यांना वर्षभर लागलं. ते म्हणतात की तुमचं खरं प्रेम हे तुम्हाला कधीना कधी परत मिळतच. ते मिळवण्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा नसते. वधू झेंग शुईंग या वयात लग्नाला तयार नव्हत्या आणि वयामध्ये ही 43 वर्षाचं अंतर होतं.

पहिलं प्रेम

झेंग यांना वयाच्या 20 व्या वर्षी एका ट्रेन अपघातात पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना व्यवस्थिती चालता येत नाही. त्यामुळे त्यांनी लग्न देखील नाही केलं. झेंग हे मागील अनेक वर्षांपासून सोशल वेलफेयर सेंटरमध्ये राहतात आणि शुईंग ही पहिली महिला ज्यांनी त्याची काळजी घेतली.

झेंग म्हणतात की शारीरीकदृष्ट्या ते कमजोर असल्याने त्यांच्यासोबत लग्नाला कोणी तयार नाही झालं. पण शुईंगला याचा काही फरक नाही पडत.

ही लव्ह स्टोरी नर्सिंग होमपासून सुरु झाली. नर्सिंग होममध्येच दोघांचा विवाह देखील होणार आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज रजिस्टर देखील केलं आणि शेवटी झेंग म्हणतात की, मी कधी विचार ही केला नव्हता की माझ्या आयुष्यात देखील आनंदाचा क्षण येईल.

असं म्हणतात ना, की प्रेमाला वय, भाषा, जाती, धर्म याचं कोणतंच बंधन नसतं. या प्रेम कहाणीमधून या दोघांनी पुन्हा एकदा ते दाखवून दिलं आहे.