बाराशे किलो गव्हात मिटवलं गँगरेप प्रकरण

अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं प्रकरण बाराशे किलो गहू घेऊन मिटवण्यात आलं आहे.

Updated: Apr 3, 2016, 10:14 PM IST
बाराशे किलो गव्हात मिटवलं गँगरेप प्रकरण title=

इस्लामाबाद: अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं प्रकरण बाराशे किलो गहू घेऊन मिटवण्यात आलं आहे. पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

पाकिस्तानच्या उमरकोट जिल्ह्यामध्ये एका 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. याबाबत पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली. पण जिरगा म्हणजेच गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी 1200 किलो गहू आरोपीकडून घेऊन प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतला, असा आरोप या मुलीचा भावानं केला आहे. 

प्रकरण मिटवण्याला विरोध केल्यानंतर आमच्या कुटुंबाला गाव सोडायला सांगण्यात आल्याचंही या मुलीच्या भावाचं म्हणणं आहे.