live अपडेट -
- राष्ट्राध्यक्ष जोको विडोवो आणि एअर ऑस्ट्रेलियाचे सीईओ टोनी फर्नांडिस सुराबया येथे निघाले आहेत. या ठिकाणाहून समुद्रातून प्रेतं बाहेर काण्याचे काम सुरू आहे. विमान समुद्रात कोसळल्याबद्दल सीईओ यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
- या दुर्घटनेतील ४० जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात इंडोनेशियन युद्धनौका बन टोमोला यश आले, असल्याचे इंडोनेशियन नेव्हीच्या प्रवक्त्याने सांगितले.
जकार्ता : एअर एशियाचे बेपत्ता विमान क्यूझेड ८५०१ चा ढिगारा मंगळवारी तपासणी दरम्यान सापडला. इंडोनेशिया नागरी उड्डान महानिदेशक दजोको मुर्जतमोदजो यांनी दिलेल्या माहितीनुसार हे निश्चित झाले आहे की हे एअर एशियाचे विमान आहे आणि परिवहन मंत्री पनगकलां बून रवाना होणार आहे.
एका रिपोर्टनुसार एअर एशियाचे बेपत्ता विमानाच्या शोध मोहिमेत सामील झालेल्या एका पथकाला जावा समुद्रात तरंगणारी प्रेत मिळालीत. हे विमान ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाल्याचे शेवटचे लोकेशन होते, तेथूनच ही प्रेत आढळून आलीत. स्थानिक टीव्हीने दाखविलेल्या एका फूटेजमध्ये एक प्रेत फुगून पाण्यावर तरंगत होते. १६२ प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांसह हे विमान जावा समुद्रात पडले होते. रविवारी याचा तपास सुरू केला होता. या शोध मोहिमेत ३० पोत आणि १५ विमानांचा समावेश होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.