पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये  दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Reuters | Updated: Nov 14, 2015, 12:29 PM IST
पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष title=

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये  दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

अधिक वाचा : पॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

सोशल साइट ट्विटरवर आयएसआयएस समर्थकांनी अरबी भाषेत केलेल ट्विट ट्रेंड होत आहे. पॅरिस जळत आहे. #ParisIsBurning हॅशटॅगने ट्विट करणारे यूजर्स आयएसआयएसच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. 

पाहा हे ट्विट
#ParisIsBurning हॅशटॅगने पोस्ट करण्यात येणाऱ्या ट्विटमध्ये घटनास्थळावरील फोटोंचा वापर करण्यात येत असून अल्लाह हो अकबर म्हटले जात आहे.

@juliamacfarlane
Death toll in Paris quickly rising to at least 60 according to French outlets #ParisAttacks

@juliamacfarlane
Supporters of #ISIS are celebrating tonight's horrific attacks in Paris using #فرنسا_تشتعل - France ignites/in flames

@MeijerHerman
#ISIS celebrating Paris attack under this hashtag #باريس_تشتعل. Translated: "Paris Burns".

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.