अबू सालेम भारताकडेच राहणार

अबू सालेमच्या प्रत्यार्पणाचा निर्णय रद्द करण्याला पोर्तुगालच्या घटनात्मक कोर्टानं कोर्टानं स्थगिती दिली आहे. अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करण्याचा निर्णय पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता.

Updated: Mar 19, 2012, 03:21 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

अबू सालेमच्या प्रत्यार्पणाचा निर्णय रद्द करण्याला पोर्तुगालच्या घटनात्मक कोर्टानं कोर्टानं स्थगिती दिली आहे. अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करण्याचा निर्णय पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता. पण आता अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करण्याच्या निर्णयाला पोर्तुगालच्याच घटनात्मक कोर्टानं स्थगिती दिली आहे. भारताच्या दृष्टीनं हा दिलासा मानण्यात येतो आहे.

 

गैंगस्टर अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द होण्याची शक्यता होती. भारतानं प्रत्यार्पण कराराचं पालन केलं नसल्यामुळे अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करावं अशी मागणी पोर्तुगालने केली होती, असा निर्णय पोर्तुगालच्या लोअर कोर्टानं दिला होता.

 

या निर्णयाविरोधात सीबीआयनं पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं. पण सुप्रीम कोर्टानं CBI ची याचिका फेटाळून लावल्यानं, अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द होण्याची शक्यता होती. सीबीआयने पोर्तुगाल सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात संविधानिक न्यायालयात अपील केलं होतं. पोर्तुगालने भारताला अश्या अटीवर अबू सालेमला भारताकडे सुपूर्त केले होते की, त्याच्यावर अश्या गुन्ह्यांवर केस नाही चालवायच्या ज्यामुळे त्याला मृत्युदंड होण्याची शक्यता आहे.