बरेली : उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यात एकाने एक तब्बल १४० महिलांसोबत शरीर संबंध ठेवल्याची बाब पुढे आली आहे. लैंगिगसंबंध ठेवलेल्यांमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
ही धक्कादायक माहिती दुसरे तिसरे कोणी दिलेली नाही तर त्याच्या अल्पवयीन मुलीनेच उघड केली आहे. या मुलीच्या माहितीनुसार वडिलांनी एका डायरीमध्ये लैंगिक संबंध ठेवलेल्या महिलांच्या नावासहीत माहिती सापडली आहे.
वडिलांची ही डायरी मुलीला एका ट्रंकात सापडली. त्या डायरीमध्ये महिलांशी कधी आणि कुठे भेट झाली आणि कोणाशी किती वेळा शरीर संबंध ठेवले याबाबतची सर्व नोंद होती.
१४० महिलांशी संबंध ठेवल्याप्रकरणी वडिलांविरोधात बरेलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या या वर्तनापायी माझ्या आईनं १४ वर्षांची असतानाच १९९७मध्ये माझे लग्न लावून दिले, असेही या मुलीने सांगितले.