काँग्रेसविरोधात `शिरोमणी`, मनीष तिवारींविरोधात `सनी`!

पंजाबच्या शिरोमणी अकाल दलाने काँग्रेसविरोधात बॉलिवूड स्टारला उभं करण्याचं ठरवलं असून यामुळे काँग्रेसच्या मनीष तिवारींना मोठं आव्हान असेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 22, 2013, 04:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लुधियाना
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. तिकिट वाटपातून अधिकाधिक मतं खेचणाऱ्या उमेदवाराची निवड चालू आहे. पंजाबच्या शिरोमणी अकाल दलाने काँग्रेसविरोधात बॉलिवूड स्टारला उभं करण्याचं ठरवलं असून यामुळे काँग्रेसच्या मनीष तिवारींना मोठं आव्हान असेल.
लुधियानामध्ये काँग्रेसचे केंद्रिय सूचना प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांच्या विरोधात शिरोमणी अकाल दल थेट बॉलिवूड अभिनेता सनी देओलला उतरवण्याच्या तयारीत आहे. पिता धर्मेंद्रनंतर सनीही याद्वारे राजकारणात उतरेल. या बाबत अद्याप अधिकृत घोषणा केली गेली नसली, तरी शिरोमणी अकाल दलाची भिस्त सनी देओलवरच आहे. देमारपटांचा सुपरस्टार असणाऱ्या सनी देओलचे लुधियाना आणि एकुण पंजाबात असणारे चाहते त्याच्या मदतीला येतील का, हे निवडणुकीत कळेलच. मात्र काँग्रेसच्या मनीष तिवारींना मात्र लोकप्रिय अभिनेत्यामुळे आपला प्रचार आणखी वाढवावा लागणार आहे.
सनी देओलच्या आधी त्याचे वडील आणि प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र यांनीही २००४ साली भाजपाकडून राजस्थानातल्या बिकानेरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र आपला राजकाणाला आपला पुरेसा वेल न दिल्यामुळे अनेकांचा रोष त्यांना ओढावून घ्यावा लागला. २००९मध्ये धर्मेंद्र निवडणुकीला उभे राहीले नाहीत. मात्र सनी देओल मनीष तिवारींसारख्या दिग्गज राजकारण्यांसमोर टिकेल की नाही, हे पाहायला मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.