नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद संसदेत

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद आज संसदेत उमटले. या हत्येचा राज्यसभेनं एकमुखानं निषेध केला. काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी सनातन, हिंदू जनजागृती समिती यासारख्या कडव्या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी केली. राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावर केंद्रानं तातडीनं विचार करावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 22, 2013, 01:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद आज संसदेत उमटले. या हत्येचा राज्यसभेनं एकमुखानं निषेध केला. काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी सनातन, हिंदू जनजागृती समिती यासारख्या कडव्या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी केली. राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावर केंद्रानं तातडीनं विचार करावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.
गांधीजींची हत्या करणारी शक्तीच दाभोलकरांची मारेकरी आहे, असं वक्तव्य करणा-या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शिवसेनेनं टीकी केलीय. दाभोलकरांची हत्या करणा-या आरोपींचा अशा कुठल्याही शक्तीशी संबंध नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. सरकारनं आपलं अपयश लपवण्यासाठी हिंदूत्तवादी संघटनांवर आरोप केलेत.सरकारनं आधी आरोपींचा शोध लावावा असं राऊतांनी म्हटलंय.
समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८ वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.