नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना कटीयार म्हणाले, केंद्रातील सरकारसाठी हा मुद्दा कोणत्याही पातळीवर कठीण नाही. राम मंदिराबाबत सरकार पातळीवर सर्व पक्षांना चर्चेत सहभागी करुन त्यावर तोडगा काढला पाहिजे.
भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा काढणे शक्य नाही. भाजपकडे ३७० जागा हव्या आहेत. त्यानंतर परिस्थिती पाहून यावर चर्चा करणे किंवा कायदा करण्याची गरज आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री रामनाथ सिंग यांनी कायदा आणि संबंधीत बाब लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. आताच राम मंदिर संदर्भात निर्णय घेता येणार नाही. तसेच राज्यसभेत सरकारचे बहुमत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर अयोध्येतील राम मंदिर बांधणीच्या मुख्य मुद्द्याशी संबंधीत कटीयार यांनी हे वक्तव्य केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.