राज भाय.. राज भाय गुजरातमध्येही `छाँ गये राज`

नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा फारच थाटामाटात पार पडला. लाखोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Updated: Dec 27, 2012, 02:03 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा फारच थाटामाटात पार पडला. लाखोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पण गुजराती बांधवांसाठी हा शपथविधीमधील एक खास आकर्षण होतं ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीला जवळजवळ डझनभर राष्ट्रीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मोदी यांचा शपथविधी असला तरी त्या शपथविधी सोहळ्यावर राज ठाकरेंचीच छाप असल्याचे दिसून आले.
(राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मोदी असल्याचे अनेकजण कुजबुजत होते) गुजरातमधील नागरिकांनाही राज ठाकरे यांच्याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. राज ठाकरे यांना पाहण्यासाठीच अनेकांनी गर्दी केली होती. सेलिब्रेटींना पाहण्यासाठी जसे लोक उत्सुक असतात. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांना पाहण्यासाठी गुजरातमधील नागरिक उत्सुक होते.
राज यांची भेट अनेक मोठ्या नेत्यांनीही घेतली. अनेक व्हीव्हीआयपी व्यक्तीही राज यांच्या भेटीनंतरच बाहेर पडले. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या प्रसंगी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित होते. राज आणि मोदी यांच्यातील दृढ संबंध यापूर्वीही दिसून आले आहेत.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल मैदानात त्यांचा शपथविधी सोहळा होतोय. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं ११५ जागा जिंकून बहुमत मिळवलं. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता.
या सोहळ्यासाठी देशातले भाजपच्या मित्रपक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रातून भाजप नेते गोपीनाथ मुंडे, उदयोगपती सुब्रतो राय हेदेखील उपस्थित आहेत.
राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित हेही होते. राज ठाकरेंच्या मनसे आणि भाजपची युती नाही. मात्र राज ठाकरे आणि मोदी यांचे सख्य पाहता त्यांना निमंत्रण होतं त्यामुळे भविष्यातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरु झाली आहे.