'जन धन योजने'चा शुभारंभ; पहिल्याच दिवशी उघडली दीड करोड खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत ‘पंतप्रधान जन धन योजने’चा शुभारंग केलाय. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Updated: Aug 28, 2014, 11:01 PM IST
'जन धन योजने'चा शुभारंभ; पहिल्याच दिवशी उघडली दीड करोड खाती title=

नवी दिल्ली : पंतप्रधान जन धन योजनेचा दिल्लीतल्या विज्ञान भवनात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

देशभरातल्या ४४ शहरांमध्ये ४४ केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे एकसाथ लाँचिंग झाले. या योजनेअंतर्गत दीड कोटी बँक खाती उघडण्यात आली. खातेदारांना १ लाखाच्या विमा सुरक्षेसह डेबिट कार्डचाही लाभ होणार आहे. देशाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना असून दीड कोटी बँक खाती उघडल्याचा नवा विक्रम नोंदवला गेल्याचं मोदींनी आपल्या भाषणात नमूद केलं. देशातल्या आर्थिक अस्पृश्यतेचं निवारण करण्याची गरज असून त्यादृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊस असल्य़ाचं मोदींनी सांगितलंय.  . 

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अर्थमंत्री अरुण जेटलीही उपस्थित होते. या योजनेंतर्गत जवळपास 15 करोड नागरिकांना बँक खात्यांशी जोडण्याची योजना आहे. अजूनही बँक सेवेपासून वंचित असणारे सामान्य या सेवेशी जोडले गेले तर देशातील प्रत्येक व्यक्तीकडे आपलं बँक खातं असेल... देशभरातील 76 केंद्रांतून एकत्रच आज या योजनेची सुरुवात केली गेली. 

जनधन योजनेचं स्वरूप आणि काय असतील सुविधा?

- आधार कार्ड असेल तर तीन मिनिटात खातं उघडणार 
- प्रत्येक खात्यासोबत RuPayचं डेबिट कार्ड असेल
- RuPay कार्डवर 1 लाख रुपयांचा अपघात विमा असेल
- NPCI प्रत्येक RuPay कार्ड सोबत विमा देणार
- बँक प्रत्येक खात्यावर 1 रूपयाचा हफ्ता घेऊन विमा देणार
- RuPay कार्डच्या वापराने ATM मधून पैशांचा व्यवहार करता येणार
- खात्यासाठी मिनिमम बॅलेन्सची गरज नाही
- बेसिक मोबाईल फोनवर मोबाईल बँकिंग सुविधा असेल
- कोणत्याही प्रकारचा App डाउनलोड करण्याची गरज नाही
- *99# डायल करून शिल्लक रक्कम तपासता येणार
- ग्राहक 99# डायल करून स्टेटमेंट आणि स्टेटसची माहिती घेऊ शकतील
- फोनवरून फक्त 5 हजार रूपयेच ही ट्रासफर करता येतील
- फोनवरून देशभरात कुठेही मनी ट्रान्सपर करण्याची सुविधा असेल
- सहा महिन्यांपर्यंत ट्रान्झॅक्शन ठिक असेल तर ओव्हर ड्रॉफ्टची सुविधा
- सरकारी पेन्शन आणि विमा स्कीम खात्याशी जोडली जाईल

 

कसं उघडता येईल बँक खातं?
- जवळच्या बँक शाखेतून कॅम्पची माहिती मिळेल
- खाते उघडण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्हावर कॅम्प लागतील
- आधार कार्ड असेल तर दुसरं काहीही कागदपत्र लागणार नाही
- काही कॅम्पमध्ये आधार कार्ड काढण्याचीही सुविधा असेल
- आधारमध्ये दिलेला पत्ता बदलवायचा असेल तर स्वत:च्या हमीने लिहून दिलेला पत्ता लागेल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.