जन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय. 

Updated: Sep 7, 2014, 11:18 AM IST
जन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल title=

जम्मू: पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय. 

पुरामुळे हजारो बेघर झालेत. आतापर्यंत 6 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. लष्कराचं बचावकार्य वेगात सुरू आहे. इथल्या परिस्थितीची पहाणी करण्यासाठी पंतप्रधान आज कश्मीरमध्ये दाखल झालेत. 

दरम्यान, काल गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पीएमओचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी पूरग्रस्त भागाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जास्तीत-जास्त नागरिंकांना सुरक्षित बाहेर काढणं हे आमचं प्राधान्या असल्याचं जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

PM will visit Jammu & Kashmir tomorrow to take stock of the situation & understand problems faced by people due to the unfortunate floods.

— PMO India (@PMOIndia) September 6, 2014

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.