www.24taas.com, नवी दिल्ली
महागाईच्या खाईत लोटलेल्या जनतेला थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोलचे दर दोन रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्टीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने तेल कंपन्या दर कमी करण्याची शक्यता आहे. येत्या एकदोन दिवसात पेट्रोलचे भाव एक ते दोन रुपयांनी कमी होवू शकतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ११५ डॉलर वरून १०५ ते ११० डॉलर प्रती बॅरलवर आले आहेत. यामुळे पेट्रोलच्या भावात कपात करणं शक्य होणार आहे.
आधीच सर्वसामान्य जनता पेट्रोलच्या भावातील वाढीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे पेट्रोलचे भाव कमी झाल्यास ही नक्कीच दिलासादायी बाब ठरणार आहे.