चेन्नई : सिंगापूरहून चेन्नईला आलेल्या एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये ३५ लाख किमतीचं एक किलो सोनं कस्मट विभागानं हस्तगत केलंय. विमानतळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये अज्ञात लोकांनी ठेवलेलं सोन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं.
हे विमान सिंगापूरहून दिल्लीहून चेन्नईला आलं होतं आणि पुढे दिल्लीला जाणार होतं. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं आहे तसंच या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
हे विमान नवी दिल्लीत पोहोचल्यावर तस्करी करणारे लोक हे सोनं विमानातून काढून घेणार होते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.