शंभर वर्षानंतर खुले झाले – कोणार्क सूर्य मंदिर

जगात स्थापत्य कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओरिसामधील सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले करण्यात येणार आहे. मुख्य मंडपातील दगड पडण्यास सुरुवात झाल्यामुळे, हे मंदिर १९१३ मध्ये बंद करण्यात आले होते. यानंतर या मंदिराच्या दुरूस्तीचं काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं होतं.

Updated: Sep 17, 2014, 04:50 PM IST
शंभर वर्षानंतर खुले झाले – कोणार्क सूर्य मंदिर title=

नवी दिल्ली : जगात स्थापत्य कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओरिसामधील सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले करण्यात येणार आहे. मुख्य मंडपातील दगड पडण्यास सुरुवात झाल्यामुळे, हे मंदिर १९१३ मध्ये बंद करण्यात आले होते. यानंतर या मंदिराच्या दुरूस्तीचं काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं होतं.

ओरिसामधील पूरीमध्ये कोणार्क सूर्य मंदिरचे सौदर्य सर्वसामान्यांनी शंभर वर्षात त्यांना पाहता आले नाही. २००८ मध्ये एएसआयने हे मंदिर सर्वसामान्यासाठी खुले करण्याचा विचार केला होता. पण मुख्य मंडपमध्ये भरण्यात आलेली रेती खचली असल्याची माहिती मंदिराचे अध्ययन करतानासमोर आली होती.

हे मंदिर आठशे वर्षापूर्वीचे असल्यामुळे भिंतीला भेगा पडल्या असून मंदिराचे गर्भ गृह आधीच पडले होते. त्यातून दोन मूर्तीं मिळाल्या असून त्यांना वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

एएसआयच्या वास्तुकार प्रतिमा बोस आणि इटलीच्या पुरातत्ववीय प्रोफेसर कॉरॉसी यांनी रिपोर्टवरून सुरक्षित असल्याचे सांगितल्यानंतरच मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येईल. पण, मंदिराच्या मुख्य मंडपाचे कामपूर्ण होण्यासाठी अजून एक वर्षांचा कालावधी तरी लागेल. त्यानंतरच हे सर्वसामान्यासाठी खुले केले जाईल. 

मंदिराचा इतिहास

इ.स.न १२५० मध्ये गंग वंशचा राजा नरिसम्हा देव पहिला त्यांनी हे मंदिर बांधले असून, कोणार्क सूर्य मंदिर हे प्राचीन ओरिसा स्थापत्या कलेच एक उत्तम नमुना आहे. या मंदिराच्या मंडपामध्ये चुंबकीय शक्ती होती. त्यामुळे या मंदिराला ब्लॅक पॅगॉडा देखली बोले जाते. हे मंदिर बांधण्यासाठी 1200 शिल्पकारांनी 12 वर्षात बनविले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.