www.24taas.com, झी मीडिया, खंडवा
बकऱ्याला त्याच्या खऱ्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी बकरीला कोर्टात बोलविण्याच्या खंडवा न्यायालयाच्या निर्णयाची केनियाने प्रशंसा केली आहे. केनियाच्या वाइल्ड लाइफ ट्रस्टने खंडवा न्यायालयाचे सीजेएम गंगाचरण दुबे यांच्या नावे पत्र पाठवले आहे.
तसेच भारत सरकारच्या वाइल्ड लाइफ बोर्डाकडून हे पत्र जिल्हाधिकारी नीरज दुबे यांना हे पत्र पाठविण्यात आले. या अनोख्या खटल्याची चक्क वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने आपल्या संपादकीय पानावर दखल घेतली आहे. ५ मे रोजीच्या अंकात या बातमीला स्थान देण्यात आले आहे.
२ मे रोजी खंडवा न्यायालयात बकरा चोरीला गेल्याची सुनावणी झाली. न्यायधिशांनी कोर्टात अनेक बकऱ्या बोलावून चोरील्या गेलेल्या बकऱ्याची खरी आईची ओळख पटवली होती. केनियातील वाइल्ड लाइफ एलिफंट मॅनेजमेंटचे प्रमुख डेव्हिड सेलड्रीक यांनी हिंदी आणि इंग्रजी वर्तमान पत्रात ही बातमी वाचली आणि या संदर्भात पत्र पाठवले.
वॉशिंग्टन पोस्टचे संपादकीय
विविध वृत्तपत्रात या अनोख्या खटल्याची बातमी आल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भात देशभरातील ४०० पेक्षा अधिक व्यक्तीची चर्चा घडवून आणली आणि याची प्रशंसा केली. तर वॉशिंग्टन पोस्टने ५ मे रोजी या बातमीला संपादकीय पानावर स्थान दिले. पजावरांच्या प्रती दाखविण्यात आलेल्या आस्थेबद्दल हे एक उदाहरण असल्याचे म्हटले आहे. यातून सर्वांनी धडा घेतला पाहिजे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.