www.24taas.com, मुंबई
रिझर्व्ह बॅंकेचं तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. रेपो रेट आणि सीआरआरमध्ये ०.२५ एवढी कपात करण्यात आली आहे. त्यामुळं होम लोन आणि वाहन कर्जावरील व्याज कमी होण्याची शक्यता आहे. महागाईच्या वणव्यात होरपळणा-या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळं ११ टक्के व्याजदरावर किती रुपयांचा फायदा होईल ? हे देखील तुम्हांला समजेल. नऊ महिन्यानंतर रेपो दरात पाव टक्क्यांच्या कपातीबाबत आशा व्यक्त होते आहे. सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आर्थिक आणि पतविकास अहवालात रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षअखेर विकासाचा दर ५.५ टक्के असेल, असं म्हटलं आहे.
महागाईचा ७.५ टक्के चढा स्तर कायम राहणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. रिझर्वे बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी यापूर्वीच्या तिमाही पतधोरणात जानेवारीत व्याजदर कपातीचे आश्वासक सूर व्यक्त केला होता.