नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी नियतकालिकामध्ये 'लव्ह जिहाद'शी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय. मॅगझिनच्या कव्हरपेजवर असलेल्या या फोटोत अर्धा चेहरा करिना कपूरचा आणि उरलेला आर्धा भाग बुरख्यामध्ये झाकलेला दाखवण्यात आलाय.
विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा 'दुर्गा वाहिनी'नं लव्ह जिहादविरोधात मोहीम छेडली आहे. मुस्लिम तरुणांशी लग्न करून गेलेल्या महिलांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची ही मोहीम आहे. याला घरवापसी असंच नाव देण्यात आलंय. हिमालय ध्वनीच्या या कव्हरपेजमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'हिमालय ध्वनी' नावाच्या मॅगझीनच्या कव्हरवर हेडलाईन 'लव्ह जिहाद' अशी देण्यात आलीय. यावर करीनाचा फोटो छापण्यात आलाय. तिचा अर्धा चेहरा नकाबनं झाकण्यात आलाय. यामध्ये, लव्ह जिहादलाही 'घर वापसी' अभियानात समाविष्ट करायला हवं, असंही म्हटलं गेलंय.
हिमाचल प्रदेशमध्ये विहिंपचं मुखपत्र असलेल्या 'हिमालय ध्वनी'च्या संपादकीयमध्ये 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतरण ते राष्ट्रांतरण' हा मुद्दा चर्चिला गेलाय. करीना सेलिब्रिटी आहे म्हणून तिचा फोटो यासाठी वापरण्यात आलाय, असं या मॅगझिनच्या संपादिका रजनी ठुकराल यांनी म्हटलंय.
करीनानं 2012 मध्ये अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाह केलाय. उल्लेखनीय म्हणजे, लग्नाच्या वेळी करीनानं धर्मांतरण मात्र केलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.