www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क सरकारनं दहा टक्यांन वरून पंधरा टक्यां वर नेलंय. या दागिन्यांची आयात रोखण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी आता सोन्याच्या दागिन्यांचे दर वाढणार आहेत. मागील वर्षी १७ जानेवारी २०१२ला सरकारनं सोन्याच्या आयात शुल्कात वाढ केली होती.
छोट्या कारागिरांचं हित जपण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. “धातू आणि दागिने यांच्या आयात शुल्कात फरक ठेवणं गरजेचं होतं.सोन्यावरील आयात वाढवल्यानंतर सुवर्णकारांचं हित जपण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांचं आयात शुल्क त्यापेक्षा जास्त ठेवणं आवश्य्क होते,” असं याबाबतच्या पत्रकात नमूद करण्यात आलंय.
सरकारनं मागील महिन्यातच सोन्यावरील आयात शुल्क वाढवून दहा टक्के केलं होतं. या वर्षात सरकारनं तिसऱ्यांदा ही वाढ केली होती. चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कही वाढवून दहा टक्के केलं होतं. सोन्याची बिस्किटं आणि खनिजांच्या रुपातील सोन्यावरील सीमाशुल्कही आठ टक्यांल आ वर नेण्यात आलं होतं. त्यानंतर आज आणखी पुढील पाऊल टाकण्यात आलंय.
सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत पीसी ज्वेलर्सचे व्यवस्थापन संचालक बलराम गर्ग म्हणाले, या निर्णयामुळं स्थानिक कारागिरांच्या हित जपलं जाईल. विशेष म्हणजे २०१२-१३ दरम्यान भारतात ५.०४ अब्ज डॉलर सोन्याची आयात करण्यात आली. तर यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यात ११.२ कोटी डॉलर सोन्याची आयात करण्यात आली. भारतात थायलंडहून जास्तीतजास्त सोनं आयात केलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.