पाटणा : तीन तलाक वरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर बचाव करताना कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुस्लिम देशात या तीन तलाक म्हटल्यावर तलाकला बंदी आहे तर भारतात का नाही? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला आहे.
सुप्रीम कोर्टात तीन तलाकच्या मुद्यावर सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतलेल्या आक्षेपानंतर प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कायदा मंत्री म्हणाले, पाकिस्तान, ट्युनिशिया, मोरक्को, इराण, इजिफ्त सारख्या डझनभर इस्लामिक देशात तीन तलाकला नियंत्रित करण्यात आले आहे. असे इस्लामिक देश कायदा बनवून अशा परंपरेवर बंदी घातल असतील आणि हे शरिया कायद्याच्या विरोधात नसेल तर भारतासारख्या सेक्युलर देशात असे होणे चुकीचे कसे आहे.
दरम्यान, प्रसाद यांनी समान नागरीक कायद्यावर विचारलेल्या प्रश्नावर काहीही बोलण्यास नकार दिला.