www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तरप्रदेशात कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी दुर्गा नागपाल यांच्या निलंबनाबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केलीय. त्यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिल्याची माहिती आहे. दुर्गा नागपाल यांना कोणत्याही ठोस कारणाशिवाय घाईघाईत निलंबित करण्यात आल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय. कोणत्याही आयएएस अधिकाऱ्यावर अन्याय होता कामा नये. केंद्र सरकार याबाबत हस्तक्षेप करू शकेल का? अशी विचारणाही त्यांनी केल्याची माहिती आहे.
सोनिया गांधी यांच्या या पत्रावर समाजवादी पार्टीतून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. केंद्रात सपाची काँग्रेसला मदत आहे. त्यामुळे हा निव्वळ देखावा आहे. सरकार काही कारवाई करणार नाही अशी टीका भाजपने केलीय. ‘सोनियांनी आपला जावई रॉबर्ट वडेरा याच्या जमीन व्यवहाराबद्दल आणि आयएएस अधिकारी अशोक खेमका यांच्या निलंबनाबद्दल पंतप्रधानांना पत्र लिहावं आणि त्यांनाही न्याय मिळवून द्यावा’ असा सल्ला द्यायलाही सपा विसरली नाहीए.
२०१० च्या बॅचमधली भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या २८ वर्षीय दुर्गा नागपाल यांना एसडीएम पदावरून निलंबित करण्यात आलं होतं. २७ जुलै रोजी एक मस्जिद पाडण्याचा आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. यामुळे सांप्रदायिक तणाव वाढला असता, असं कारण देऊन त्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.