नवी दिल्ली : दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून गठित प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलंय. याबाबत मंडळाने कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती केली.
प्रदूषण रोखण्यासाठी कोर्टाने जे आदेश दिले होते त्याचे पालन झालं आहे की नाही यावरही सुप्रीम कोर्ट विशेष लक्ष देणार आहे. गेल्या सुनावणी दरम्यान प्रदूषणाच्या मुद्यावरुन सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला फटकारलं होतं. सरकारला भविष्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
मात्र दिल्ली सरकारचं धोरण जुनंच असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. आता नव्याने होणा-या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट प्रदूषणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना कठोर निर्देश देण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीतल्या नागरिकांना विषारी हवेपासून काहीसा दिलासा मिळालाय.