छत्तीसगडमध्ये मोदींसाठी `गुजरात`ची सुरक्षा!

आज भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेद्वार नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमध्ये तीन सभा होत आहेत. या सभेसाठी मोदींच्या भोवती गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांचा ताफा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 7, 2013, 01:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
आज भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेद्वार नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमध्ये तीन सभा होत आहेत. या सभेसाठी मोदींच्या भोवती गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांचा ताफा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना सुरक्षा व्यवस्था देण्य़ावरून सध्या राजकारण रंगलंय. मोदींना एसपीजीची सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जातेय तर सरकारने मात्र मोदींना पुरेशी सुरक्षा म्हणजेच ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविली असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हा वाद रंगलाय. दरम्यान, मोदींनी गुजरातमधले आपले आयपीएस अधिकारी आपल्या सुरक्षेसाठी तैनात केलेते. छत्तीसगडमधल्या सभांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आणि सभास्थळाची पाहणी गुजरातचे आयपीएस अधिकारी करत आहेत.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या रॅलीअगोदरच राज्यातील वेगवेगळ्या भागांतू १०० किलोपेक्षा जास्त स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आलीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.