गुजरात दंगलीबाबत आपल्याला दु:ख - नरेंद्र मोदी

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीबाबत आपल्याला दु:ख आहे,मात्र अपराधीभाव नाही, असं एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटंलय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 26, 2014, 09:03 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीबाबत आपल्याला दु:ख आहे,मात्र अपराधीभाव नाही, असं एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटंलय.
ब्रिटीश लेखक एण्डी मरिनो यांचे NARENDRA MODI : A POLITICAL BIOGRAPHY या आगामी पुस्तकात हा दावा करण्यात आलाय. आपल्यामुळे लोकांना त्रास झाला, म्हणून मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा होती, पण गुजराथची जनता आणि पक्षाची तशी इच्छा नसल्यानं राजीनामा दिला नाही, असं मोदी यांनी सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय.
या प्रकरणात कोणत्याही न्यायालयानं आपल्याला दोषी ठरवलेलं नाही,याकडेही मोदींनी लेखकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लक्ष वेधलंय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या पुस्तकाला मजूकर प्रसिद्ध करुन, मोदींनी या प्रकरणी एकप्रकारे मतदारांना संकेत दिल्याचं मानलं जातंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.