www.24taas.com, नवी दिल्ली
सध्या सोन्याच्या दरात कमालीची घट होत आहे. प्रतितोळा २४,००० रूपये (दहा ग्रॅम) सोने होण्याची शक्यता आहे. याची तीन काय आहेत कारणे?
सोन्या दरात घट होत असल्याने गुंतवणूक करण्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. सोन्याची घटती किंमत कितीवर स्थिर होईल? मात्र, तज्ज्ञांचे मते सोन्याचा प्रतितोळा भाव आणखी घसरून २४,०००वर येईल.
बॅंक ऑफ अमेरिका, मॅरिल लिंच यांनी स्पष्ट केलंय की, सोन्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. बॅंक तज्ज्ञांचे मते सोन्याच्या किमतीत घट झाली तर भारतातही सोन्याची किंमत प्रतितोळा २४ हजार रूपये इतकी खाली येईल.
सोन्याच्या किमतीत आणखी घट येईल का? हीच वेळ खरेदीसाठी योग्य आहे? मात्र, सोन्याच्या किमतीत अचानक घट आलेली नाही. यासाठी बराच वेळ लागला आहे आणि तो अजून जाण्याची शक्यता आहे.
२००८मध्ये सोन्याची किंमत १०,५०० रूपये प्रतितोळा (दहा ग्रॅम) होता. हा दर २०१२ ला वाढला. तो एकदम ३२,५०० हजार रूपयांवर पोहोचला. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची स्थिती निर्माण झाली.
गेल्या तीन दिवसात सोन्याची किमत एकदम खाली आली. मंगळवारी सोने १८ महिन्यानंतर २५,२७० रूपये प्रतितोळा आले. या दरात सुधारणा होत सोन्याचा भाव २६,७००रूपयांवर पोहोचला.
१४ टन सोने विकणार
आर्थिक मंदीत सापडलेला सायप्रस देश सोने विकणार आहे. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी या देशाने हे पाऊल उचलले आहे. या देशातील केंद्रीय रिझर्व्ह बॅंक १४ टन सोने विकणार आहे. तसे बॅंकेने म्हटले आहे. ही बातमी आंतरराष्ट्रीय बाजारात हलचल करणारी ठरली. त्यामुळे आपल्याकडे सोन्याचा स्टॉक बाहेर काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर १०० डॉलरने खाली आला.
युरोपमधील सेंट्रल बॅंक सोना विकणार असल्याने गुंतवणुकदारांमध्ये घबराट निर्माण झाली. सायप्रस देशाप्रमाणे युरोपातील अन्य देशांनी सोने विकण्याची घोषणा केली तर सोन्याची किंमत ठरविणे कठिण होईल, अशी भीती निर्माण झाली.
अमेरिकेत आर्थिक सुधारणा
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत गेल्या सहा-सात महिन्यात सुधारणा होत गेली. त्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झालाय. अमेरिकेतील आर्थिक मंदी दूर होत आहे. अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत आहे. त्यामुळे सोने हे पैसे कमवायचे एकमात्र साधन किंवा पर्याय नसल्याचे स्पष्ट झालेय.
आंतरराष्ट्रीय स्थिती प्रतिकूल
आंतरराष्ट्रीय प्रतिकुल स्थिती सोन्याच्या किमतीसाठी जबाबदार आहे. सिरियातील अंतर्गत कलह आणि उत्तर आणि दक्षिण कोरियातील युद्धजन्य परिस्थिती सोने दरात घट होण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट होत गेली आहे. जगातील केंद्रीय बॅंका सुरक्षा म्हणून सोने राखीव कोठा ठेवतात. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे जगातील सराफा व्यापारावर याचा परिणाम झाला.
याशिवाय गोल्ड मॅक्सबरोबर अन्य विश्लेषकांनी सोने विकण्याच्या पर्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली. तर अमेरिकेतील गोल्ड इक्वीटीएफचे नियंत्रण कमी करण्यात आल्याने सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.