झोपणाऱ्या मुलाची सुरक्षा करताहेत चार कोबरा, व्हायरल झाला व्हिडिओ

 किंग कोबरा. सांगण्याची गरज नाही हे दोन शब्द उच्चारले तरी चांगल्या चांगल्याची गाळण उडते. हे सहाजिकही आहे. कारण कोबराचे नाव सर्वात घातक सापांमध्ये समाविष्ट आहे. पण विचार करा एक नाही दोन नाही तब्बल चार साप एका चिमुरड्यांला कुंडली मारून बसले आहे. खरोखर पाहणाऱ्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास नाही बसत. पण तुम्ही ऐकून हैराण व्हाल, हे साप त्या मुलाशी खेळतात आणि त्याची सुरक्षाही करतात. सोशल नेटवर्कवर साप आणि मुलाच्या मैत्रीचा हा अद्भूत व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Updated: Jul 22, 2014, 06:51 PM IST
झोपणाऱ्या मुलाची सुरक्षा करताहेत चार कोबरा, व्हायरल झाला व्हिडिओ title=

नवी दिल्ली :  किंग कोबरा. सांगण्याची गरज नाही हे दोन शब्द उच्चारले तरी चांगल्या चांगल्याची गाळण उडते. हे सहाजिकही आहे. कारण कोबराचे नाव सर्वात घातक सापांमध्ये समाविष्ट आहे. पण विचार करा एक नाही दोन नाही तब्बल चार साप एका चिमुरड्यांला कुंडली मारून बसले आहे. खरोखर पाहणाऱ्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास नाही बसत. पण तुम्ही ऐकून हैराण व्हाल, हे साप त्या मुलाशी खेळतात आणि त्याची सुरक्षाही करतात. सोशल नेटवर्कवर साप आणि मुलाच्या मैत्रीचा हा अद्भूत व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

साप आणि लहान मुलाच्या मैत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मुलगा सापांसह खेळताना दिसतो आहे. नंतर या मुलांला झोप येत आणि तो झोपून जातो. खास गोष्ट ही की मुलगा झोपला तरी कोबरा साप फणा काढून त्या मुलाची सुरक्षा करतात. 

व्हिडिओ कुठला आहे, कोणी शूट केला आहे याची माहिती नाही. पण व्हिडिओ यूट्यूबसह सर्व सोशल नेटवर्कवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओसंबंधी चर्चांनाही उधाण आले आहे. काही लोकांच्या मते हा व्हिडिओ एखाद्या गारुड्याने काढला आहे. सामान्यतः गारुडी सापांना पाळतात. त्यामुळे पाळलेल्या साप मुलाला काहीच करीत नाही. 

पाहा हा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.