www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`गुजरात - विकासाचं मॉडेल` अशी स्तुती अशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी करत असतात. मात्र, आता त्यांच्या या स्तुतीवर कॅगनं सवाल उपस्थित केलेत.
गुजरातमधल्या कुपोषणावर कॅगने ताशेरे ओढलेत. गुजरातमध्ये प्रत्येक तीन मुलांमागे एक मूल कुपोषित असल्याचे निरीक्षण कॅगने या अहवालात नोंदवलंय. शिवाय गुजरातच्या समेकित बाल विकास योजना आणि पोषण आहार योजनेवरही कॅगने सवाल उपस्थित केलेत. गुजरातमध्ये प्रत्येक तीन मुलांमागे एका मुलाचं वजन सरासरीपेक्षा कमी असल्याचं कॅगने म्हटलंय.
पूरक आहार कार्यक्रमाअंतर्गत २२३.१४ लाख मुलं लाभार्थी होण्यासाठी योग्य होते. परंतु यातील ६३.३७ लाख मुलं मात्र या योजनेपासून वंचितच राहिली. हा अहवाल गुरुवारी गुजरात विधानसभेत सादर करण्यात आला. मुलींच्या पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत २७ ते ४८ टक्क्यांपर्यंत कमतरता दिसून आलीय
राज्यात ७५,४८० आंगनवाडी केंद्रांची गरज होती. परंतु आत्तापर्यंत केवळ ५२, १३७ केंद्रांनाच परवानगी मिळालीय आणि केवळ ५०,२२५ केंद्र कार्यरत आहेत. यामुळे १.८७ करोड लोकसंख्य ‘आयसीडीएस’च्या फायद्यांपासून लांबच आहे.
‘आयसीडीएस’ योजनांसाठी केंद्र सरकारकडून केवळ २००८-०९ पर्यंत संपूर्ण धनराशी प्राप्त झालीय यामध्ये १० टक्के हिस्सा राज्य सरकारला करावा लागतो, असंदेखील कॅगनं आपल्या अहवालात म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.