एकेकाळी भारतावर राज्य कंपनीवर भारतीयानं मिळवला ताबा!

'ईस्ट इंडिया कंपनी'... ज्या कंपनीच्या नावावर ब्रिटिशांनी भारतावर १०० वर्ष राज्य केलं तीच ही कंपनी... पण, आता मात्र या कंपनीवर एका भारतीयानं ताबा मिळवलाय. 

Updated: Aug 27, 2015, 05:21 PM IST
एकेकाळी भारतावर राज्य कंपनीवर भारतीयानं मिळवला ताबा! title=

मुंबई : 'ईस्ट इंडिया कंपनी'... ज्या कंपनीच्या नावावर ब्रिटिशांनी भारतावर १०० वर्ष राज्य केलं तीच ही कंपनी... पण, आता मात्र या कंपनीवर एका भारतीयानं ताबा मिळवलाय. 

मुंबईचे उद्योगपती संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीला खरेदी केलंय. यासाठी संजीव मेहता यांना मोठी किंमतही मोजावी लागलीय. पण, मेहता यांच्यासाठी ही केवळ व्यावसायिक डील नव्हती तर भावनात्मक डीलही होती. 

संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीतले ५० टक्क्यांहून जास्त शेअर्स खरेदी केलेत. यासाठी आपण दिवस-रात्र एक केल्याचं ते सांगतात. हाच माझ्या जीवनाचा उद्देश बनल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

मुंबईतल्या एका हिरे व्यापारी असलेल्या कुटुंबात संजीव यांचा जन्म... आपल्यावर ज्यांनी एव्हढे वर्ष राज्य केलं त्या कंपनीचा मालक असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून आता जाणवतोय. 

ईस्ट इंडिया कंपनीला आता नव्या बिझनेसमध्ये आणण्याचा प्रयत्न संजीव मेहता करणार आहेत. यासाठी ते ई-कॉमर्सचीही मदत घेणार आहेत. 

ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात १६०० मध्ये झाली होती. कंपनीनं १७ व्या आणि १८ व्या शतकात संपूर्ण जगाच्या बिझनेसवर त्यांनी राज्य केलंय. १७५७ मध्ये ही कंपनी भारतात दाखल झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.