नवी दिल्ली : जीएसटीचे दर अखेऱ जीएसटी समितीनं निश्चित केले आहेत. जीएसटीच्या या दरांची 5%, 12%, 18% & 28% अशा चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
यामध्ये जीवनावश्यक वस्तूंवर कमीतकमी म्हणजेच 5% जीएसटी असेल तर चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक 28% जीएसटी द्यावा लागेल. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्नधान्यांना कोणताही जीएसटी लागणार नाही. एक एप्रिल 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
लक्झरी कार, तंबाखू आणि दारू यांच्यावर सर्वाधिक म्हणजेच 28 टक्के जीएसटी आणि अॅडिशनल सेस लावण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटलींनी सांगितलं आहे.