नवी दिल्ली : आज संपूर्ण भारतात लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणामुळे चिंतीत आहे. लहान मुलांना कळतच नाही की ते कधी वासनांधांची शिकार होतात. नुकताच दिल्लीत एक सिरीअल किलर पकडला गेला. तो लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ठार मारत होता.
तो एकमेव अपराधी नाही, जो अशा गुन्हात सामील असतो. संपूर्ण भारतात असे काही सायको किलर आहेत, जे लहान मुलांना आपल्या वासनेचे शिकार बनवून त्यांच्या आयुष्याशी खेळतात. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांना मनात आपल्या मुलांबद्दल असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. या असुरक्षेच्या भावनेमुळे ते आपल्या मुलांला घरातच कोंडून ठेऊ शकत नाही.
आता वेळ आली आहे, की लहान मुलांबाबत मोठ्यांना या प्रकरणी गंभीर होणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना जागरूक करायला हवे, कारण माहितीच यापासून वाचण्याचे साधन आहे.
पाहू या बाल लैंगिक शोषणाशी निकडीत काही धक्कादायक सत्य
१) ज्या व्यक्ती आपल्या लैंगिक तृप्तीसाठी लहान मुलांचे शोषण करतात त्यांना सायको सायन्समध्ये पीडोफिलीया म्हणतात. अशा व्यक्तींना लहान मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवायला मजा वाटते.
२) मनोविज्ञानिकांच्या मते पीडोफिलियाने पीडित असलेल्या व्यक्तींचा पूर्व इतिहास तपासणे गरजेचे असते. अशा व्यक्तींच्या डोक्यात काही राग भरलेला असतो, हा राग त्यांना राक्षसी कृत्य करण्यास भाग पाडतो.
३) आपल्या देशात या गुन्हाच्या विरोधात लैंगिक गुन्ह्यातून बालकांची सुरक्षा व्हावी यासाठी २०११ च्या कायद्यात संशोधन करण्यात आले आहे.
४) नव्या कायद्यानुसार बालकांच्या लैंगिक शोषणासोबत त्यांच्यासमोर अश्लिल हावभाव किंवा वर्तन करणेही गुन्हा आहे.
५) अनोळखी व्यक्तीने लहान मुलाच्या गालाला हात लावला, त्याला स्पर्श केला तर हे देखील लैंगिक शोषणचा भाग आहे.
६) अनोळखी व्यक्ती लहान मुलांसमोर अश्लील पुस्तक वाचणे, पोस्टर पाहणे, अश्लील गाणे ऐकणे हे देखील गुन्हा आहे.
७) बालकांचे लैंगिक शोषण होण्यात पाच ते १२ वर्षांतील मुलाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सांगितले आहे.
८) तीन प्रकारचे शोषण समोर आले आहेत. शारिरीक, लैंगिक आणि भावनात्मक
९) ५० टक्क्यापेक्षा अधिक मुलं कोणत्या ना कोणत्या शारिरीक शोषणाचे बळी आहेत.
१०) कौटुबिक स्थितीत शारिरीक शोषित मुलांमध्ये ८८. ६ टक्के मुलांचे शोषण त्यांचे नातेवाईकच करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.