नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख खात्यांवर कारवाई?

नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या बँक खात्यांत प्रचंड रकमा जमा झाल्या, अशा १८ लाख संशयास्पद खात्यांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ९ लाख खात्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचा माहिती असून कारवाई होण्याची शक्यता आहे.

PTI | Updated: Feb 17, 2017, 08:03 AM IST
नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख खात्यांवर कारवाई? title=

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या बँक खात्यांत प्रचंड रकमा जमा झाल्या, अशा १८ लाख संशयास्पद खात्यांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ९ लाख खात्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचा माहिती असून कारवाई होण्याची शक्यता आहे.

९ लाख खात्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचा माहिती आयकर विभागाला आहे. मात्र ३१ मार्च रोजी माफी योजना संपल्यानंतर या ९ लाख खात्यांवर काय कारवाई करायची, याचा निर्णय घेण्यात येईल. ऑपरेशन क्लीन मनी या योजनेखाली आयकर विभागाने संशय आलेल्या १८ लाख खातेदारांना एसएमएस आणि ई-मेल पाठवून, खुलासे मागविले होते. 

त्या खातेदारांनी दिलेल्या माहितीचे नंतर विश्लेषण करण्यात आले. ज्यांनी खात्यांमध्ये ५ लाखांहून अधिक रक्कम जमा केली, त्यांनाच १५ फेब्रुवारीपर्यंत खुलासा देण्यास सांगितले होते.