पाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटना, मृतांचा आकडा 91वर

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डब्बे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून 150हून अधिक जण जखमी झालेत. 

Updated: Nov 20, 2016, 12:18 PM IST
पाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटना, मृतांचा आकडा 91वर

कानपूर : पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डब्बे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून 50हून अधिक जण जखमी झालेत. 

पहाटे साडे चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील कानपूरमधील पुखराया रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात घडलाय. रेल्वे रुळ उखडल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. 

अपघातानंतर स्थानिक, पोलीस आणि प्रशासनाकडून मदत तसेच बचावकार्याला सुरुवात करण्यात आलीय. मेडिकल टीम घटनास्थळी दाखल झाली असून  एनडीआरएफची टीमही रवाना झालीय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.